खेड : शिव परमात्मा या धरेवर अवतरित होऊन ८९ वर्षे पूर्ण झाली असून, महाशिवरात्रीनिमित्त आत्म्याचे सत्य ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांनी ईश्वरी विश्व विद्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन खेड सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी गीता बहेन यांनी येथे केले. बुधवार दि.२६ रोजी खेड येथील प्रजापिता ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या उत्सवासाठी सैन्य दलातील निवृत्त कर्नल प्रकाश चव्हाण, रोटरी स्कूलचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विपीन पाटणे, महिला कीर्तनकार ह.भ.प. वीणाताई महाडिक, उद्योजक अमोल बुटाला, वैद्य दिव्या बेकर, पत्रकार अनुज जोशी आदी उपस्थित होते. विद्यालयाच्या प्रांगणात महिला कीर्तनकार वीणाताई महाडिक यांच्या हस्ते शिव ध्वज आरोहण करण्यात आले. त्यानंतर सहस्र कमलेश्वर शिवलिंग दर्शन देखाव्याचे उद्घाटन कर्नल प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे यांनी शिवलिंगाला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 27/Feb/2025














