देवरूख : श्री क्षेत्र टिकलेश्वर परिसर झाला प्रकाशमान

देवरूख : देवरूखनजीकच्या हजारो भाविकांचे श्रद्धास्थान, पर्यटकांचे आकर्षण केंद्र असणाऱ्या श्री क्षेत्र टिकलेश्वरचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

तब्बल ५० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ४५ लाख रुपये खर्च करून हे काम करण्यात आले आहे. या कामासाठी संगमेश्वर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केला होता. महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत यांना निकम यांनी धन्यवाद दिले असून, हे काम पूर्ण केल्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

संगमेश्वर तालुक्यातील टिकलेश्वर परिसर हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांवर वसलेला आहे. यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात टिकलेश्वर दर्शनाचा लाभ घेतात. या ठिकाणी भक्तगण रहिवासासाठी देखील जातात. जंगलमय परिसर असल्यामुळे या ठिकाणी विद्युतीकरण होणे गरजेचे होते. रात्रीच्या वेळी जंगली श्वापदे तसेच सापांची भीती असते.

याची दखल आमदार शेखर निकम यांनी सतत पाठपुरावा करत हे काम पूर्णत्वास नेले आहे. आमदार शेखर निकम यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 27/Feb/2025