खेड : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी मांडवी एक्स्प्रेस येथील स्थानकात थांबली असता रत्नागिरी मधील एका महिलेचे सोन्याचे मंगळ सूत्र व १० हजार रोकड असा ६० हजार रुपयांचा मुद्दे माल दोन अनोळखी महिलांनी चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ४:२० वाजण्याच्या सुमारास घडली.
निशात अलिमुद्दीन काद्री, वय ३७ वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. रुम नं. ३४५ शिवखोल राजीवाडा व्हीटीसी रत्नागिरी जि. रत्नागिरी. असे दागिने व रोकड चोरीस गेलेल्या महिलेचे नाव आहे गाडी नं. १०१०४ मांडवी एक्सप्रेस खेड रेल्वे स्थानक येथे उभी असताना फिर्यादी निशात अलिमुद्दीन काद्री, यांना दोन अनोळखी महिलांनी फिर्यादी यांचेशी संगनमताने भांडण करुन हाताने थापटाने फिर्यादी यांना चापट मारली व त्या त्यादरम्यान फिर्यादी यांचे गळ्यातील मंगळसूत्र व शोल्डर पर्स मधील रुपये १०, हजार व मंगळसूत्र चोरून नेले या प्रकरणी अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 27/Feb/2025














