गुहागर : तालुक्यातील कर्दे गावातील देऊळवाडी, गुरववाडी व सनगरेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. जागेवर रस्ताच शिल्लक नसल्याचे पहावयास मिळत आहे.
सगळीकडे रस्त्याची खडी वर येऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना यामुळे वाहन चालवणे देखील मुश्कील झाले आहे. बाजारपेठ व वैद्यकीय सेवा देखील ५ किलोमीटरवर असणाऱ्या नरवण येथे असल्याने ग्रामस्थांना याच रस्त्यावरून येजा करावी लागत आहे. दररोज जीव मुठीत धरून दुचाकी चालक या रस्त्यावरून प्रवास करत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात देखील होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार व प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 27-02-2025














