गुहागर : तालुक्यातील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या एनसीसी कॅडेटस् व विद्यार्थ्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अग्निपथकाद्वारे आग आटोक्यात आणण्याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिकाद्वारे आगीवर कसे नियंत्रण मिळवायचे, याची माहिती देण्यात आली.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अग्नी शाखेद्वारे शाळेतील विद्यार्थी, एनसीसी कॅडेट यांना आगीबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान यांनी सांगितले की, अनेक वेळा आजूबाजूला घर, दुकान येथे आग लागल्यानंतर यासाठी आवश्यक अग्निशामक यंत्रणा येईपर्यंत काय करावे? यंत्रणा उपलब्ध नसल्यास आग आटोक्यात आणण्यासाठी काय करावे, याची माहिती विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली.
या प्रशिक्षणाचा भविष्यात सर्वांनाच उपयोग होऊ शकेल, असे सांगण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापक कांबळे, एनसीसी विभागाचे प्रमुख ढोणे, शिक्षक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 27/Feb/2025














