रत्नागिरी : शिरगाव शिवरेवाडीतील रखडलेल्या रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

रत्नागिरी : शिरगावातील शिवरेवाडीतील रस्त्याचे रखडलेले डांबरीकरण शिमगा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावा, यासाठी ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली असून ते या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. प्रमुख ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे अभियंता अमोल ओटवणेकर यांची भेट घेतली. सुमारे ७०० मीटरच्या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. शिमगोत्सव तोंडावर आला आहे. ४ मार्चपासून फाकपंचमी सुरू होत आहे. शिवरेवाडीतील रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर दीड वर्षांपूर्वी देण्यात आली आहे.

परंतु ठेकेदाराने कामाला सुरूवातच केलेली नाही. आता गावागावातील पालख्या माव प्रदक्षिणेसाठी मंदिरांबाहेर पडणार आहेत. शिवरेवाडीतील ग्रामदेवतेची पालखीसुद्धा बाहेर पडणार आहे. परंतु शिवरेवाडीतील सुतारवाडीपर्यंतच्या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गुरूवारी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेवून तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करण्याची विनंती केली. शिवरेवाडीतील एकूण १२०० मीटरचा रस्ता असून त्यातील ५०० मीटरचा रस्ता पूर्ण झाला आहे. त्यातील ७०० मीटर रस्त्याचे काम रखडले आहे. सुमारे ३० लाख रुपये खर्चाचा हा रस्ता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 28/Feb/2025