Pune Rape Case: स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक

Dattatray Gade Arrested: स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. तसेच गावकऱ्यांनी त्याला गावात पहिल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याची ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला. ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता. अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.

दरम्यान स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १३ पथके रवाना करण्यात आली होती. तसेच डॉगस्कॉड, ड्रोनच्या साहाय्यानेही आरोपीची शोधमोहीम सुरु आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते..

Amey jwelrs

बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गाव परिसरात गेल्याची माहिती समोर आली होती. इतकच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत
होती. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जात होता. अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला आहे.

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे काय म्हणाले?

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी आरोपी ताब्यात असून पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो गुनाटमध्ये होतं असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. गुनाटच्या गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला मदत केली आहे. गावाच्या एका भागातून ताब्यात घेण्यात आलं आहे, असं निखिल पिंगळे म्हणाले. झोन 2, क्राईमच्या टीम, ड्रोनची पथकं, आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस पथकं होती. गावकऱ्यांनी मोठं सहकार्य केलं आहे, असं निखिल पिंगळे म्हणाले.

पाणी मागण्यासाठी गेला अन् सरेंडर व्हायचंय म्हणाला

शिरूर तालुक्यातील गुणाट या गावांमध्ये रात्री दीडच्या सुमारास पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु असताना दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. Dog squad च्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत होते.

दत्तात्राय गाडे बाराच्या सुमारास याच गावातील त्याच्या नातेवाईकांच्या घरी तोफ पाण्याची बाटली मागण्यासाठी गेला होता. पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याने जे काही मी केलं त्याचा मला पश्चाताप झाला आहे, असं दत्तात्रय गाडे म्हटल्याची माहिती आहे. मला पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे असा बोलून परत निघून गेला होता.

दत्तात्रय गाडे पाणी घेऊन गेल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली. गाडे याच्या अटकेमध्ये गुनाट गावातील पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांचं मोठं सहकार्य पोलिसांना लाभलं. गाडे याला पोलिसांनी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिलं असून या संदर्भात पुढील तपास त्यांच्याकडून करण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 28-02-2025