चिपळूण नगर पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

चिपळूण : गेल्या काही महिन्यांपासून येथील मध्यवर्ती बसस्थानक तसेच शहरातील भोगाळे परिसरात हातगाडी आणि खोकेरधारकांचे अतिक्रमण वाढले होते. या अतिक्रमण विरोधात पालिकेने गुरुवारी हातोडा उगारत मोठी कारवाई केली. तब्बल ७८ खोके व हातगाडी धारकांवर कारवाई करण्यात आली. यातील काहींचे साहित्य जप्त केले. चिंचनाका ते पॉवर हाऊस दरम्यान अतिक्रमण केलेल्या जागेत खोदाई करून बंदोबस्त केला आहे. यापुढे याभागात पुन्हा अतिक्रमण झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

येथील पालिकेने दोन महिन्यांष्यों बाजालेठसह उपनगर भागात तसेच चिंचनाका ते पॉवरहाउस दरम्यान अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. मात्र त्यानंतर ही कारवाई थंडावताच पुन्हा त्याचठिकाणी मोठ्या संख्येने अतिक्रमण झाले होते. रस्त्यालगत खोके उभारून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी ठेवल्याने पादचाऱ्यासह वाहतूकदारांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याविषयी गेल्या काही दिवसांपासून ओरड सुरू होती. याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे मुख्य गटार बुजले होते.

या भागातील सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. गटारे तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. अखेर पालिकेने हे खोके व हातगाडीधारकांना साहित्य हटविण्यासाठी मुदत दिली होती. मात्र तरीही संबंधितांनी खोकी न हटवल्याने गुरुवारी पालिकेने अतिक्रमण हटाव मोहिम जोरदारपणे राबवली. मात्र पालिकेने अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे व्यावसायिकांची पळापळ झाली.

मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, वैभव निवाते, रोहिणी खाडे, संदिश टोपरे, बांधकाम अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजीत जाधव, संतोष शिंदे, राजेंद्र जाधव, वलित बांगडे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्वतःहून साहित्याची विल्हेवाट
मध्यवर्ती बसस्थानक व भोगाळे परिसरातील ७८ हून अधिक खोके य हातगाड़ी धारकांवर कारवाई केली. ३ जेसीबी व ३ डंपरच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये काहीचे साहित्य जमा करून पालिकेकडे जमा केले आहे. काहींनी स्वतःहून साहित्याची विल्हेवाट लावली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 28/Feb/2025