पालकमंत्री डॉ. उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे १ मार्च रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून, तालुक्यातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

ना. उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार १ मार्च २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता कवलापूर हेलिपॅड (ता. मिरज, जि. सांगली) येथून हेलिकॉप्टरने पाली (ता. जि. रत्नागिरी) कडे प्रयाण, सायंकाळी ४ वाजता हेलिकॉप्टरने पाली हेलिपॅड (ता. जि. रत्नागिरी) येथे आगमन व मोटारीने हातखंबाकडे प्रयाण, सायंकाळी ४.३० वाजता श्री स्वामी समर्थ पेट्रोलियम, हातखंबा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : सिद्धगिरी मंगल कार्यालयाजवळ, हातखंबा, जि. रत्नागिरी). सायंकाळी ५ वाजता ‘पुढारी आयकॉन’ सन्मान सोहळा-२०२५ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ देसाई बैंक्वेट हॉल, हॉटेल विवेक, माळनाका, रत्नागिरी). सायंकाळी ६ वाजता श्री हनुमान भक्त सेवा मंडळ (फणसवळे) आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी).

याचबरोबर सायंकाळी ७.०० वाजता कुरतडे डुगवे लोटेश्वर मंदिर भक्तीनिवास बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम. (स्थळ कुरतडे डुगवे, ता. जि.रत्नागिरी). सायंकाळी ७.३० वाजता कुरतडे डुगवे ग्रामस्थ पक्ष प्रवेश (स्थळ : कुरतडे डुगवे, ता. जि. रत्नागिरी). रात्री ८ वाजता हरचेरी भैरी मंदिर येथे भेट व दर्शन (स्थळ : भैरी मंदिर, हरचेरी, ता.जि. रत्नागिरी). रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:53 AM 01/Mar/2025