चिपळूण : कापसाळमध्ये दिव्यांगाला लोखंडी पाईपने मारहाण

चिपळूण : तालुक्यातील कापसाळ येथे शेताचे बांध घालण्यावरून एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण करण्यात आली. याची नोंद चिपळूण पोलिस ठाण्यात झाली आहे.

गणेश विठ्ठल खेडेकर (वय ४१) हे कापसाळ पायरवाडी येथे राहतात. त्यांची स्वतःची पान टपरी आहे. पायरवाडी येथील गजानन खेडेकर यांच्या घराशेजारील शेतामध्ये रवींद्र काशीनाथ खेडेकर आणि गणेश खेडेकर यांच्यामध्ये २४ फेब्रुवारीला दुपारी शाब्दिक चकमक उडाली. गणेश खेडेकर हे दिव्यांग आहेत. तरीही रवींद्र खेडेकर यांनी त्यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. याप्रकरणी गणेश खेडेकर यांनी रवींद्र खेडेकर यांच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 04/Mar/2025

Kore Mobile