विकास निर्देशांकांत रत्नागिरी जिल्हा सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

रत्नागिरी : विविध विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्ह्याने पुन्हा एकदा प्रथम क्रमांकांवर झेप घेतली आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.

यासाठी जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले. ‘जिल्हा निर्देशांक’ सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारावर हा निर्देशांक नोंदवला जातो. पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’ तर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 08-03-2025