डेरवण येथे यूथ गेम्स आजपासून

चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चौरटीज ट्रस्ट आयोजित शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या अकराव्या डेरवण दूध गेम्सचे दि. १० मार्च ते १६ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. डेरवण येथील क्रीडा संकुलात १८ खेळांच्या स्पर्धासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे.

या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, किनस्टिक, बैडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कैरम, देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळासह फुटचॉल, यहॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला बॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाचीही स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे.

भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील आठ हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. १२०० पदके, ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस रूपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारांत राज्यातील खेळाडूंबा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.

या स्पधेचे उद्‌घाटन दि. १० मार्च रोजी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त, ऑलिम्पियन स्वप्नील कुसाळे यांच्या प्रशिक्षिका दीपाली देशपडि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेत ८ वर्षांखालील ते १८ वर्षांखालील खेळाडू सहभागी होणार आहेत.

Infigo Eyecare

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 10-03-2025