रत्नागिरी : तरुणांनी साकारली कोलकाता बोटीची प्रतिकृती

रत्नागिरी : रत्नागिरीतील तरुणांनी शिप मॉडेलिंग विषयात आवड दाखवत भारतीय नौसेनेची कोलकाता बोटीची सुमारे पंधरा फूट लांब आकाराची प्रतिकृती तयार केली. ही बोट मुंबईत पश्चिमी बेडा (फ्लॅग ऑफिसर नेव्हल कमांड ऑफिस) येथे पाठवली जाणार आहे.

ड्रीम मॉडेल क्राफ्ट या फर्मचे प्रमुख मयूर वाडेकर हे चांदेराई रत्नागिरी येथील रहिवासी असून, शिप मॉडेलिंगमध्ये अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांच्या टीमने १५ दिवसरात्र मेहनत करून कोलकाता या लढाऊ बोटीची प्रतिकृती तयार केली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी वाडेकर यांना नीलेश मिस्त्री (वांद्री), गणेश पांचाळ (निवळी), महेंद्र कोलगे (कोतवडे) यांनी सुतारकामासाठी मदत केली. तसेच संदेश जाधव व पांडुरंग बाईत यांनी सॅडिंग व फॅब्रिकेशनचे काम पाहिले. फहद लाला, यश डोंगरे, निहारिका राऊत यांनी मरिन फिटिंग व मदतनीस म्हणून काम पाहिले. रेडियमसाठी दानियल सारंग यांनी सहकार्य केले. शिर्के प्रशाला, गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्स यांनीही शिप बनवण्यासाठी सहकार्य केले. भाट्ये येथे कोलकाता लढाऊ बोट पाहण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांनी गर्दी केली.

शिप मॉडेलिंग या विषयात कोकणचा मोठा वाटा गेली अनेक वर्षे भारतीय नौदलात राहिला आहे. यापूर्वी देखील भारतीय नौदलात कोकणात तयार करण्यात आलेल्या बोटींचा समावेश होता. हे लक्षात ठेवून कोकणातील तरुणांनी याकडे करिअर म्हणून देखील पाहिले पाहिजे. – मयूर वाडेकर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 11-03-2025

Tata SUV