लांजा आगाराला मिळाल्या तीन नव्या एसटी बस

लांजा : लांजा आगारासाठी उपलब्ध झालेल्या तीन नवीन एसटी बसचा लोकार्पण सोहळा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत झाला. या नवीन बस मिळाव्यात यासाठी आमदार सामंत यांनी पाठपुरावा केला होता.

नवीन एसटी बस मिळाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. लांजा आगारासाठी तीन आणि राजापूरसाठी चार अशा सात एसटी बस विधानसभा मतदारसंघात आल्या आहेत. विधानसभा निवडणूक प्रचार करताना ग्रामीण भागातील जनतेमधून लालपरीबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. अनेक ठिकाणी एसटी बसविषयी अडचणी समोर येत होत्या. तेव्हा आमदार सामंत यांनी सविस्तर माहिती घेतली. त्यांनी नवीन बस आणू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार लांजा आगाराला तीन बस मिळाल्या आहेत. रविवारी (ता. ९) या बसचा लोकार्पण सोहळा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी लांजा आगारप्रमुख काव्या पेडणेकर, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरूप, विलास चाळके, तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत, शहरप्रमुख सचिन डोंगरकर, अल्ताफ काझी, संदीप दळवी, संजय यादव, गुरूप्रसाद तेली आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 12/Mar/2025