रत्नागिरी जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगार तडीपार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांवर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली. स्वप्नील बाळू पाचकुडे (रा. करबुडे, रत्नागिरी) आणि सफी उल्ला समीर सोलकर (रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी त्यांची नावे आहेत.

या दोघांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार करण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस ठाणे अभिलेखावर असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी तडीपारीची कारवाई करण्यात येते.

सन २०२४ मध्ये जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून एकूण ७ सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर सन २०२५ मध्ये आजपर्यंत २ सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 13/Mar/2025