भारताची राजमुद्रा उलट लावणाऱ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचे बॅनर पंचायत समिती जवळील भिंगार्डे कॉम्प्लेक्सच्या संरक्षण भिंतीवर लावण्यात आले आहेत. हे बॅनर गेले १/२ महिन्यापासून जनतेच्या निदर्शनास आणण्यासाठी प्रसिद्ध केलेले आहेत. सदरचे बॅनर वरील माहिती उलटी लावून राजमुद्रा देखील उलट्या लावलेल्या आहेत. ही राजमुद्रा उलट्या पद्धतीने लावणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी छावा मराठा योद्धा संघटना संपर्कप्रमुख नयमेश दळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवताना चिपळूण पंचायत समिती जवळ येईल भिंगार्डे कॉम्प्लेक्स जवळ भिंतीवर लावण्यात आलेले बॅनर त्याच्यावर असलेली राजमुद्रा उलट्या पद्धतीने लावण्यात आली आहे त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. आपण या संरक्षण भिंती जवळून गाडीने अनेक वेळा ये जा करता. तसेच पंचायत समिती चिपळूण कार्यालयातील अनेक अधिकारी सुद्धा ये जा करत असतात ही बाब आपल्या लक्षात यायला हवी होती. परंतु आपणही याकडे दुर्लक्ष केले आहे.

सदर राजमुद्राचे बॅनर कोणत्याही विभागाने लावले व लावणारी व्यक्ती कोण? करून संबंधीतावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 14/Mar/2025

Dr amey pathak