आठल्ये- सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण

देवरूख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ व ज्ञानदा गुरुकुल संस्था, वाघोली, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आठल्ये सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख येथे ‘प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानदा गुरुकुल संस्थेचे मोबिलायझेशन ऑफिसर सोमनाथ कुलकर्णी, टेक्निकल हेड सुरज पाटील, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

१८ ते ३० या वयोगटातील तरुणांसाठी हा अभ्यासक्रम ज्ञानदा गुरुकुल संस्थेने तयार केला आहे. या अंतर्गत दोन महिन्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थांना दिले जाते. अत्यल्प शुल्कामध्ये हा कोर्स महाविद्यालयामध्ये उपलब्ध झाला आहे. हा अभ्यासक्रम १००% नोकरीची हमी देणारा असून, आजवर जवळपास सोळाशे तरुण या अभ्यासक्रमानंतर स्वावलंबी झाले आहेत.

अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयामध्ये सुरू झाली असून, त्याकरिता समन्वयक प्रा. विकास शृंगारे, प्रा. डॉ. मयुरेश राणे, प्रा. अभिनय पातेरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 14/Mar/2025

Fitness