साखरपा-रत्नागिरी फेरीला दिला मार्गफलक

साखरपा : नव्याने सुरू झालेल्या साखरपा-रत्नागिरी एसटी फेरीला मार्गफलक देण्यात आला आहे.

कोंडगाव ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांच्या प्रयत्नातून सकाळी साखरपा-रत्नागिरी ही फेरी नव्याने सुरू करण्यात आली आहे. सकाळी साखरपा परिसरातून रत्नागिरीला जाण्यासाठी एसटी नाही, ही बाब ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी विभागाकडे एसटी सुरू करावी, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी पत्रव्यवहारही केला. सातत्याने पाठपुरावा केल्यावर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन लांजा आगारातर्फे सकाळी साखरपा-रत्नागिरी ही एसटी फेरी सुरू करण्यात आली आहे. या बसला मार्गफलक नसल्याने तो मार्गफलक आठल्ये यांनी स्वखर्चाने तयार करून साखरपा स्थानकाकडे सुपूर्द केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 05-10-2024