थ्री डी मॅपिंग मल्टिमीडिया शो मुळे रत्नागिरी पर्यटनाच्या राष्ट्रीय नकाशावर

रत्नागिरी : काल थिबा पॅलेस येथे नगरपालिकेतर्फे थ्री डी मल्टिमीडिया शो माध्यमातून कोकणातील भारतरत्न प्राप्त महनीय व्यक्तींचे तसेच शिवछत्रपती, लो. टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आदींचे अप्रतिम दर्शन झाले. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या भारदस्त आवाजात सुंदर निवेदन लाभले आहे.

खुल्या नाट्यगृहातील साधारणतः ३५ मिनिटाच्या शोमध्ये अनेक ध्वनी प्रणालीचा केलेला वापर आपल्याला इतिहासात घेऊन जावून आनंद देतो. या शोमुळे शहराच्या पर्यटन विकासात मोलाची भर पडेल. लॅटरल कन्सेप्ट कन्सल्टंट प्रा. ली यांनी प्रकल्प सल्लागार म्हणून जबाबदारी घेतली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून शहराच्या सौंदर्यकरणात भर पडली याबद्दल अभिनंदन!, असं मत ॲड. विलास पाटणे यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:01 18-03-2025