गुहागर : आबलोलीत आरोग्य तपासणी

गुहागर : गुहागर पंचायत समिती, प्रकृति फाऊंडेशन व लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण यांच्या माध्यमातून मोफत कॅन्सर, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आबलोली खालील पागडेवाडी सभागृहात घेण्यात आले. या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील महिला व पुरुष यांची कॅन्सर तपासणी, आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी करण्यात आली. आबलोली येथील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी उत्तम आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. तसेच प्रकृती फाऊंडेशनच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी सरपंच वैष्णवी नेटके, डॉ. प्राची दिलवाले, डॉ. स्वरदा जाधव, अभिजित सुर्वे, वैभव जोशी, अॅड. प्रमेय आर्यमाने, सचिन कारेकर, सूर्यवंशी सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 19/Mar/2025

Tata aeris