रत्नागिरी : रत्नागिरीत गुरुवारी, दि. २० मार्च रोजी सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ (नेरूर, ता. कुडाळ) यांचे लोकराजा दशावतारी नाटक सादर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात दशावतार लोककला प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत दशावतार रंगरंगोटी, वेशभूषा, प्रयोग तयारी याचे प्रात्यक्षिक होणार आहे. त्यानंतर त्यानंतर दुपारी १२ वाजता दशावतारी नाटक होणार आहे. रत्नागिरीतील रंगकर्मी आणि प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 20-03-2025














