खेड : खोपी येथील वणव्यात चार घरे जळून खाक

खेड : सध्या उन्हाळा सुरू आहे. ठिकठिकाणी वणवे लागून ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यात बसेलल्या खेड तालुक्यातील जाभेलवाडी गावातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेली धनगर समाज बांधवांची ४ घरे शनिवारी २२ रोजी वणव्यात जळून खाक झाली आहेत.

खोपी जाभेलवाडी या धनगरवाडी मध्ये पाणी व रस्ता नसल्याने काही कुटूंबे उन्हाळ्यात पाण्याच्या जवळ स्थलांतरित होतात. त्यामुळे गेल्या महिन्यातच या वाडीतील ही घटना घडली, तेव्हा घरांमध्ये कोणीही राहत नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. परंतु, घरातील धान्य, भांडी व कपडे जळून खाक झाल्याने ४ कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या मध्ये पार्वती बबन ढेबे, रंजना लक्ष्मण ढेबे, लक्ष्मी जानू ढेबे व मोहन जानू ढेबे यांच्या कुटुंबांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणेने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. तालुक्यात सातत्याने विविध ठिकाणी वणवे लागत असून त्यामुळे गेल्या दोन महिन्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

खोपी येथे धनगर बांधवांची घरे जुळून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेऊन शासन त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सहकार्य करेल, अशी अपेक्षा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरीचे अध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी व्यक्त केली आहे.

Tata nexon

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 24/Mar/2025