संगमेश्वर : असुर्डेमधील ओढ्यात मृत खेकडे

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे येथील ओढ्यात मृत खेकडे आढळून आले आहेत. कोणत्या कारणाने खेकडे मेलेत याचे कारण समजू शकले नसले, तरी खेकडे पकडण्यासाठी विषारी द्रव्याचा प्रयोग केल्याचा संशय आहे.

असुर्डे बौद्धवाडी येथे ओढा आहे. या ओढ्याच्या ठिकाणी प्रदीप मोहिते हे गेले असता त्यांच्या नजेरेस सुरुवातीला मेलेले एक-दोन खेकडे दिसून आले. याकडे त्यांनी गांभीयनि न पाहता दुर्लक्ष केले. मात्र, पुढे त्यांना अजून काही प्रमाणात मेलेले व काही दिवसांपूर्वी मेलेले असे खराब झालेले खेकडे दिसून आले. त्यांनी ओढ्यातून काही अंतरापर्यंत चालत जाऊन पाहणी केली.

अनेक मृत खेकडे त्यांना दिसून आले. याची माहिती त्यांनी सरपंच प्रदीप शिंदे यांना दिली. खेकड्यांची शिकार करण्यासाठी विषारी द्रव्य पाण्यात टाकले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विषारी द्रव्याचा वापर करण्यात आला असेल, तर या अघोरी प्रकारचा नाहक फटका येथील ओढ्यातील पाणी पिऊन तहान भागवण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाळीव मुक्या जनावरांसह रानटी पशुपक्ष्यांच्या जीवावर बेतू शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 31/Mar/2025

Radhakrushna patapedhi