इन्फिगो फाउंडेशनकडून रत्नागिरीत दुसऱ्यांदा ज्वेलरी प्रशिक्षण

रत्नागिरी : येथील इन्फिगो फाउंडेशनकडून रत्नागिरीत महिलांसाठी दुसऱ्यांदा ज्वेलरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आजकाल विविध प्रकारची ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहे.

मुली-महिलांना अशी आकर्षक ज्वेलरी फार आवडते. अनेकींना अशी आधुनिक ज्वेलरी स्वतः करायची इच्छा असते. काहींना येत असली तरी विविध डिझाइन्स मिळाली तर हवी असतात. हाच मुद्दा विचारात घेऊन इन्फिगो फाउंडेशने सामाजिक जाणिवेतून व महिलांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी व्हावे याकरिता रत्नागिरीमध्ये आधुनिक ज्वेलरी मेकिंगचे कौशल्य प्रशिक्षण शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी खास आयोजित केले आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध डिझाइन व ज्वेलरी मेकर अश्विनी करकरे प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे प्रशिक्षण इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये होणार आहे. यामध्ये लागणारे विशेष प्रकारचे साहित्य इन्फिगो फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहे. याशिवाय स्वतः तयार केलेला बांगड्या, हार व कानातील दागिने असा सेट प्रत्येकीला मोफत मिळणार आहे.

बेसिक आणि अॅडव्हान्स अशा २ कोर्सच्या कार्यशाळेची योजना तयार करण्यात आली आहे. अॅडव्हान्स कोर्समध्ये ७० आणि बेसिकमध्ये ८० महिलांना प्रवेश दिला जाईल. बेसिक कोर्स ११ एप्रिल रोजी दुपारी १ ते साडेतीन किंवा साडेचार ते सात या वेळेत होईल. ॲडव्हान्स कोर्स १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी साडेबारा किंवा दुपारी अडीच ते ५ या वेळेत होईल. सहभागासाठी 9021502206 या क्रमांकावर नोंदणी करावी. अॅडव्हान्स कोर्सकरिता २००, तर बेसिक कोर्सकरिता १०० रुपये नोंदणी शुल्क आहे. नोंदणी करणाऱ्यांना कार्यक्रमाविषयी अधिक तपशील वैयक्तिक कळविण्यात येईल. २ एप्रिल अखेरपर्यंत नोंदणीची मुदत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 31-03-2025