मंडणगड तहसील कार्यालयात ‘व्हॉटस् अॅप’ ग्रुपच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक

मंडणगड : राज्य शासनाने शंभर दिवसांचा कृती आराखडा उपक्रमांतर्गत मंडणगड तहसील कार्यालयाने व्हॉटस्अॅप माध्यमातून समस्यांची सोडवणूक करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जनतेच्या सेवेसाठी शासनाच्या माध्यमातून कृती कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी दिली.

लोकांची वेळ व पैसे वाचविण्यासाठी तहसील कार्यालयाद्वारे मोबाईल व्हॉट्सअॅप क्रमांकावर अर्जदार नागरीकांच्या तहसील कार्यालयाशी संबंधित असणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे.

दापोली महसूल उपविभागांर्तगत हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यावर राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, शासकीय योजना, विविध उपक्रम यांची माहिती देण्यात येणार आहे. या ग्रुपमध्ये ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 01/Apr/2025