चिपळूण : तालुक्यातील तळसर बौद्धवाडी येथे साकव, रस्ते आणि विविध अंतर्गत विकासकामांचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्याहस्ते झाले. या कामांमुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.
यावेळी आ. शेखर निकम यांनी समाजमंदिरासाठी दिलेला शब्द लवकरच पूर्ण करणार असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारामुळे प्रत्येक समाजाला पुढे जाण्याची संधी मिळाली. विकासाची ही गंगा तळसर बौद्धवाडी सारख्या भागापर्यंत पोहोचली, हेच खऱ्या लोकशाहीचे प्रतिक आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सूर्यकांत खेतले, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, निलेश कोलगे, मयूर खेतले, लक्ष्मण येडगे, सिद्धी पिटले, विजय मुंडेकर, महेश कदम, शंकर खरात, राम वरके, शाम खेतले, रवींद्र म्हादे, संजय मोहिते, श्याम जाधव, सचिन मोहिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 03/Apr/2025














