खेड : चंडिका देवीची १५ एप्रिल रोजी यात्रा

खेड : खेड तालुक्यातील वावे येथील श्री चंडिकामाता देवीची १५ एप्रिल रोजी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता लाटेचे पूजन करून लाट पाडण्यात येईल. महाप्रसादानंतर लाटेची मिरवणूक काढून लाट मंदिरात आणण्यात येईल. सायंकाळी ६ वा. लाट/बगाड खरखांबावर स्थापन करण्यात येणार आहे. रात्री ९ वा. १५ गावतील निमंत्रित पालख्यांचे यात्रेसाठी आगमन होईल.

रात्री १०.३० वा. ढोल-ताशांच्या गजरात पालख्यासह ग्रामदेवीची पालखी मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचत-गाजत छबिना काढण्यात येईल रात्री १२ वा. पारंपरिक रितीप्रमाणे लोकनाट्य तमाशा होईल यात्रेत बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 08/Apr/2025

Happy journey english