चिपळूण : चिपळूण परिसरातील चैत्र महिन्यातील यात्रोत्सवाला दि. १२ पासून प्रारंभ होणार आहे. पुढील दहा ते पंधरा दिवस विविध ठिकाणी चैतावली यात्रा होणार असून या निमित्ताने गावागावात चाकरमानी येणार आहेत तर ग्रामदेवतांच्या पालख्यांचा मोठा उत्सव साजरा होणार आहे.
१२ एप्रिल रोजी दसपटीची कुलस्वामिनी श्री रामवरदायिनीची यात्रा दादर येथे होणार आहे. या निमित्ताने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील शिंदे आणि कदम कुटुंबीय या यात्रेनिमित्ताने एकत्र येणार आहेत. याच दिवशी कापसाळ येथील सुकाई देवी, तर टेरव येथील श्री भवानी-वाघजाई देवीची यात्रादेखील होणार आहे.
दिनांक १३ रोजी कोंढे, दि. १४ रोजी रेहेळ, दि. १५ रोजी रामपूर चव्हाणवाडी, दि. १६ रोजी दोणवली व मिरजोळी येथील श्री महालक्ष्मी, दि. १७ रोजी भोम येथील यात्रा होईल. दि. १८ रोजी मजरे कौंढर, दि. २० रोजी वैजी-शिरळ-मालघर ग्रामदेवता श्री सुकाई देवीची यात्रा होईल. २१ रोजी कात्रोळी देऊळवाडी, २३ रोजी कात्रोळी लायकवाडी, २४ रोजी शिरळ ग्रामदेवता, तर २५ रोजी रामपूर येथील अखेरची यात्रा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 12/Apr/2025














