मंडणगड : आंबडवेत उद्या जिल्हास्तरीय अपरांत साहित्य कला संमेलन

मंडणगड : अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी जिल्हा शाखा रत्नागिरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ, आंबडवे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जिल्हास्तरीय अपरान्त साहित्य कला संमेलन १३ एप्रिल २०२५ रोजी आंबडवे येथे आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मासिक सम्मासंबुद्धचे संपादक आणि अपरांत साहित्य कला प्रबोधिनीचे जिल्हाध्यक्ष संजय गमरे तर उद्घाटक म्हणून आंबडवे गावचे ज्येष्ठ सल्लागार सुदाम सकपाळ स्वागताध्यक्ष म्हणून आंबडवेचे मुंबई अध्यक्ष महेंद्र सकपाळ, ग्रामीण अध्यक्ष सुदर्शन सकपाळ उपस्थित राहाणार आहेत. दुपारी २ वा. उद्घाटन होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव तर आभार प्रदर्शन किशोर कासारे करणार आहेत.

दुसऱ्या सत्रात पुस्तकावर बोलू काही हा परिसंवाद दुपारी ३.३० वा. होणार आहे त्यामध्ये संदेश पवार यांच्या ‘पुरोगामी महाराष्ट्र उजव्या वळणावर’ या पुस्तकावर सुनील जाधव, चित्रकार लेखक चंद्रकांत घाडगे यांच्या ‘बेधडक’ या पुस्तकावर भा.ला. टूले, कवी किशोर कासारे यांच्या ‘पोसोन’ या पुस्तकावर धम्मचारी सत्यसिद्धी, नथुराम जाधव यांच्या ‘महामाता रमाई’ या पुस्तकावर किशोर कासारे मांडणी करणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नथुराम जाधव, स्वागताध्यक्ष आदेश मर्चेंडे, सूत्रसंचालन उत्तम पवार तर आभार पी. बी. जाधव मानणार आहेत.

तीसऱ्या सत्रात सायं ४.३० वा. अपरांत कवी संमेलन कवी किशोर कासारे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यात नयन गमरे, सुनीत गमरे, धम्मचारी सत्यसिद्धी, सतीश खैरे, जयेश जाधव, मनोज लोखंडे, रवीकुमार जाधव, सुशील शिर्के, संदेश पवार, सुनील जाधव, संजय कांबळे, संतोष मोहिते, राजेश जाधव, राजेश इंगळे, श्रेया पवार, सिद्धी कासारे, प्रणाली गमरे, प्रमोद गमरे, अनिल जाधव कविता सादर करतील.

Amey jwelrs

या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्षस्थान रेशमा मर्चेंडे, सूत्रसंचालन राजेश जाधव तर आभार मनोज लोखंडे मानणार आहेत. चौथ्या सत्रात सायं ५.३० वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’ या पुस्तकाचा परिचय पत्रकार संदेश पवार करणार आहेत.

पाचव्या सत्रात सायं ६.०० वा. समारोप होणार आहे यावेळी सर्व मार्गदर्शक, वक्ते, कवी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रमोद जाधव भूषवणार असून सूत्रसंचालन सुनील जाधव तर आभार प्रदर्शन धम्मचारी सत्यसिद्धी करणार आहेत. या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करावे, असे आवाहन अपरांत साहित्य कला प्रबोधिनीचे जिल्हा सरचिटणीस सुनील जाधव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ आंबडवेचे सुदर्शन सकपाळ यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 12/Apr/2025