आर्थिक उत्पन्न देणाऱ्या फळ पिकांची लागवड मंदावली

दापोली : कोकणात शेतकऱ्यांना अगदी सहज उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळ पिकांची लागवड मंदावली आहे. जांभूळ, फणस, कोकम या पिकांची लागवड ही व्यापारीदृष्ट्या फायदेशीर असून या फळपिकांबाबत दापोली कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या फणस, कोकम, करवंद या जाती विकसित केल्या आहेत.

हापूस आंबा, काजू, नारळ, न सुपारी या पिकांवर शेतकरी वर्षभर त अवलंबून असतो. सातत्याने होणारी वादळे यामुळे नारळ आणि सुपारी बागा उध्वस्त झाल्या असून नवीन लागवड व होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यात हातावर मोजण्या इतक्याच नारळ, सुपारीच्या बागा उरल्या आहेत. तर ही सातत्याने बदलत्या वातावरणाचा फटका आंबा, काजू या नगदी पिकांना बसू लागला आहे. त्यामुळे दरवर्षी ही क पिके नुकसानीत जात आहेत त्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे.

हंगामात पिकणाऱ्या जांभूळ, फणस, कोकम, करवंद या पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो हे दापोली कोकण कृषी विद्यापीठाने नवीन जाती विकसित करून दाखवून दिले आहे. कोकमाच्या कोकण अमृता, कोकण हातीस या नवीन विकसित जातीची लागवड केल्यास एक झाड जवळपास १४० ते १५० किलो उत्पन्न मिळवून देणार आहे. काही ठिकाणी याची लागवड देखील करण्यात आली असून त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे.

तर विद्यापीठाने फणसाची कोकण प्रॉलिफीक आणि जांभळाची कोकण बहाडोली या नवीन जाती विकसित केल्या असून या लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळू शकते. मात्र कोकणात ही लागवड दुर्लक्षित होत असल्याने कोकम, जाभुळ, करवंदाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याचा परिणाम त्यावर अवलंबून असलेल्या इतर उत्पादनावर होत आहे. कोकम पासून सरबत, आगळ, फणसा पासून फणस भाजी, सुके गरे, जांभळापासून जांभूळ पावडर ही उत्पादने महाग होण्याची शक्यता आहे.

योग्य पद्धतीने हंगामी फळ पीक घेतल्यास उत्पन्न चांगले मिळते. त्यात कोकम, फणस या हंगामी पिकाला मागणीदेखील चांगली आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी आंबा, काजू या फळ पिकांबरोबर हे जोड पीक घेतल्यास कुटुंबाची आर्थिक घडी बसू शकेल- सतीश सदाशिव मनोहर, बागायतदार शेतकरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 15/Apr/2025