जागतिक मेमन दिनानिमित्त रत्नागिरीत उद्या भव्य रक्तदान शिबिर

रत्नागिरी : मेमन जमात रत्नागिरीच्या वतीने जागतिक मेमन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या विशेष दिनाचे औचित्य साधून, उद्या दिनांक २० एप्रिल, २०२५ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मेमन जमात रत्नागिरीचे अध्यक्ष जनाब आरिफभाई मेमन यांनी रत्नागिरीतील सर्व नागरिकांना या सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे नम्र आवाहन केले आहे.

रक्तदान हे जीवदान असून, या उदात्त कार्यात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी पुढे येऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान!” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन, या पुण्यकार्यात सहभागी व्हा आणि गरजूंना जीवनदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tata motars tiago

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 19-04-2025