रत्नागिरीत गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई

20 एप्रिल 2025 | रत्नागिरी, महाराष्ट्र
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अमली पदार्थ गांजा सेवन करणाऱ्या दोन व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई केली आहे. ही कारवाई रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगांव, शेटयेवाडी परिसरात 19 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या सूचनांनुसार ही मोहीम राबवण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना, महालक्ष्मी मेडिकल स्टोअरच्या मागील बाजूस दोन व्यक्ती चिलीमसदृश्य साहित्याच्या सहाय्याने गांजा सेवन करत असल्याचे आढळले. पथकाने तात्काळ खात्री केली असता, त्यांच्याकडे गांजा हा अमली पदार्थ आढळून आला. यानंतर दोन्ही व्यक्तींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 152/2025 दाखल करण्यात आला.

या कारवाईत पकडलेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
शब्बीरअली शहानवाझ पटेल, वय 28 वर्षे, रा. रहेबर मोहल्ला, साखरतर, रत्नागिरी.
शफाकत हसन आदम राजपुरकर, वय 36 वर्षे, रा. अकबर मोहल्ला, साखरतर, रत्नागिरी.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रमोद वाघ, सपोफौ सुभाष भागणे, पोहवा शांताराम झोरे, बाळू पालकर, प्रवीण खांबे, अमित कदम, गणेश सावंत, विवेक रसाळ आणि योगेश शेट्ये यांनी यशस्वीपणे पार पाडली. रत्नागिरी शहर पोलीस ठाणे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

अमली पदार्थांविरुद्ध कडक धोरण
मा. पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी अमली पदार्थांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे रत्नागिरी शहरात अमली पदार्थांचा वापर आणि विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा निर्धार दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 21-04-2025