चिपळूण : शहरातील स्वामी मठ तिठा मार्कंडी ते रामेश्वर मंदिर या अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व रूंदीकरण करण्याचे नियोजन न.प.ने केले आहे. त्यानुसार या रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी काही कच्ची बांधकामे तोडण्याचे काम दोन दिवसांपूर्वी झाले. मात्र, या कच्च्या बांधकामाचे दगड, माती अज्ञाताने रस्त्यावर टाकून वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण केल्याची घटना घडली. या बावत काही जागरूक नागरिकांनी ही बाब न.प.च्या निदर्शनास आणताच तातडीने रस्त्यावरील दगड-माती हटविण्यात आली.
आमदार शेखर निकम यांच्या निधीतून स्वामी मठ ते रामेश्वर मंदिर या रस्त्याचे नूतनीकरण, मजबुतीकरण व रूंदीकरणाचे काम नगर परिषदेच्या माध्यमातून होत आहे. त्यानुसार पवन तलाव मैदानामागील या रस्त्यानजिक रूंदीकरणाला आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून घेण्याकरिता रस्त्यानजिकची अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. त्या नियोजनानुसार दोन दिवसांपूर्वी रस्त्यानजिक असलेले एक कच्चे बांधकाम काढून टाकण्यात आले होते. हे बांधकाम काढल्यानंतर काही वेळेतच त्या बांधकामातील दगड, माती, विटा अज्ञातानी या रस्त्यावरच फेकल्या.
परिणामी, काही काळ या मार्गावरील वाहतूक असुरक्षित झाली. तसेच पादचाऱ्यांना त्रास झाला. मात्र, जागरुक नागरिकांनी ही बाब न.प. च्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने रस्त्यावरील दगड, माती, विटा बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 AM 21/Apr/2025














