खेड : खेड नगर परिषदेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ९५ कोटी ६३ लाख ३ हजार ९४५ रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या वर्षी कोणतीही करवाढ प्रस्तावित नाही, असे स्पष्ट करत नगर परिषदेने नागरिकांना दिलासा दिला आहे.
प्रशासक तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात ९५ कोटी २८ लाख १३ हजार ७७० रुपये तरतूद करण्यात आली आहे.
खेड नगर परिषदेचा यंदाचा अर्थसंकल्प खर्चाच्या नियंत्रित नियोजनाबरोबरच नागरिकांवरील आर्थिक बोजा वाढवणार नसल्यामुळे जनहिताचा दृष्टिकोन जपणारा आहे. आगामी वर्षभरात सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा व सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विविध विभागांसाठी खर्चाचे वाटप
सामान्य प्रशासन, निवृत्तीवेतन व करवसुलीः ३ कोटी ३३ लाख १३ हजार अग्निशमन व दिवाबत्ती : ७६ लाख ३६ हजार ९९६ पाणी पुरवठाः ३ कोटी ८८ लाख ८५ हजार स्वच्छता विभागः २ कोटी ९३ लाख २१ हजार दवाखाना विभाग: ४७ लाख २ हजार सार्वजनिक उद्यानेः १३ लाख ६५ हजार ५०० बांधकाम विभागः २ कोटी ९२ लाख ५० हजार भांडवली खर्चः ६ कोटी ९८ लाख २७ हजार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 21/Apr/2025














