खेड : शहरातील वाणीपेठ येथील एका नारळाच्या दुकानात नारळ खरेदी करत असताना बाजूला ठेवलेल्या पर्समधील अंदाजे 4 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर दोन अज्ञात महिलांनी डल्ला मारल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दागिने असलेली पर्स चोरीला गेल्याचे निदर्शनास येताच धक्का बसलेल्या विवाहितेने पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनीही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काहीच धागेदोरे हाती लागले नसल्याचे समजते.
तालुक्यातील मुरडे येथील रहिवासी सायली संदीप बडबे या बोरघर येथील माहेरी एका विवाह सोहळ्यासाठी जाण्याकरिता येथील बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी आल्या होत्या. आपण वाचत आहात ग्रामीण वार्ता वाणीपेठ येथील एका दुकानात नारळाचे दर काढून नारळ खरेदी करतेवेळी त्यांनी त्यांची पर्स बाजूला ठेवली होती. त्या नारळ खरेदीत मग्न असल्याची संधी साधत तेथे उभे असलेल्या दोन महिलांनी सोन्याचे दागिने असलेल्या पर्ससह लागलीच पोबारा केला.
विवाहितेच्या पर्समध्ये तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह मंगळसूत्र, सोनसाखळी व इतर असा अंदाजे चार लाखांच्या आसपास ऐवज होता. विवाहितेने दोन अज्ञात महिलांच्या दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी लगतचे सीसीटीव्ही देखील तपासले. मात्र, यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे समजते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 21/Apr/2025
