खेड : २१ एप्रिल २०२५ | स्थान: खेड, रायगड
खेड तालुक्यातील दिवाण खवटी रेल्वे स्टेशनजवळ २० एप्रिल २०२५ रोजी पहाटे ०३:१५ वाजण्याच्या सुमारास तुतारी एक्सप्रेस (गाडी क्रमांक ११००४) मध्ये एक धक्कादायक चोरीची घटना घडली. या घटनेत एका अनोळखी व्यक्तीने प्रवाशाच्या गळ्यातील ४१,००० रुपये किमतीची ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सृष्टी प्रकाश चव्हाण (वय २८, रा. मंगलमुर्ती कॉम्प्लेक्स, विचुंबे, पनवेल, जि. रायगड) या तुतारी एक्सप्रेसच्या एस-८ डब्यातील सिट क्रमांक २१ वर झोपून प्रवास करत होत्या. गाडी दिवाण खवटी रेल्वे स्टेशनजवळील सिग्नलवर थांबली असता, एका अनोळखी व्यक्तीने खिडकीतून हात घालून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. चोराने चैन हिसकावल्यानंतर रेल्वे रुळांवरून पळ काढला. ही घटना घडल्यानंतर सृष्टी चव्हाण यांनी तातडीने खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
खेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक ११३/२०२५ नोंदवला असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाशीही संपर्क साधला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 21/Apr/2025














