संगमेश्वर : राहत्या घरी पाय घसरून पडलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड किंजळकरवाडी येथील ८४ वर्षीय जयराम बाच किंजळकर यांचा उपचारादरम्यान कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे मृत्यू झाला. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२४ रोजी सकाळी ५:०० वाजता जयराम किंजळकर हे त्यांच्या राहत्या घरी पाय घसरून पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र, त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात २० एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२:१५ वाजता अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 21/Apr/2025