चिपळूण : रामपूरमध्ये २५ एप्रिल रोजी केदारनाथ चैत्रावली यात्रा

रामपूर : चिपळूण तालुक्यातील रामपूर गावची ग्रामदेवता चैत्रावली यात्रा शुक्रवार दि. २५ एप्रिल रोजी रामपूर तळ्याचीवाडी सहाणेवर होणार आहे. या यात्रेत १६ ग्रामदेवतांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा भाविकांना पाहता येणार आहे. जिल्ह्यातील मोठी यात्रा अशी या यात्रेची ओळख आहे.

या यात्रेमध्ये रामपूर केदारनाथ, वरदान, देवखेरकी येथील अमृतेश्वर, मानाई देवी, वैजी ग्रामदेवता, निर्व्हळ, पाथर्डी, नवरतवाडी, पोसरे, मिरजोळी, कोंढे, कळवंडे माडवाडी, पाग, पिंपळी, गोंधळे, सापिर्ली या ग्रामदेवतांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रात्री होणार आहे. यानंतर कोंढे गोपाळवाडीचे नमन होईल. यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

केदारनाथ चैतावली यात्रेस उपस्थित राहावे, असे आवाहन रामपूर केदारनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास चव्हाण, कार्याध्यक्ष वामन चव्हाण, उपाध्यक्ष मनोज चव्हाण, सेक्रेटरी धनंजय रावराणे, खजिनदार गणेश चव्हाण, सहसेक्रेटरी दत्तात्रय मोरे, सल्लागार सत्यवान म्हामुनकर, तुळशीराम चव्हाण, कार्यकारिणी सदस्य, केदारनाथ सेवा मंडळ मुंबई अध्यक्ष पी. आर. चव्हाण, कामगार नेते शंकर साळवी आदींनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 23/Apr/2025