रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खुल्या लेखस्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण महोत्सवी खुल्या लेखस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे. महाविद्यालयीन गटासाठी १) कोकणातील भारतरत्न, २) मी वाचलेली चरित्रे / मला प्रभावी करणारे नेते, ३) वाचनाने दिलेली दृष्टी ४) ग्रंथ-सखा, मित्र, मार्गदर्शक व खुल्या गटासाठी १) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वाचनप्रेम २) वाचनाने घडले नेतृत्व स्वातंत्र्यसंग्राम आणि भारतीय नेतृत्वाच्या संदर्भात ३) ग्रंथालय चळवळ आणि महाराष्ट्राची जडणघडण ४) वाचन- ज्ञान आणि मनोरंजन यापैकी एका विषयावर लेख लिहायचा आहे.

लेख स्वहस्ताक्षर किंवा टंकलिखित असावा, शब्दमर्यादा १००० ते १२०० स्पर्धकाने संपूर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी, स्वतंत्र कागदावर लिहून जोडावा, स्पर्धकाने लेखासोबत ओळखपत्राची छायाप्रत जोडावी. हा २४ मे २०२५ पर्यंत महेंद्र रामचंद्र दळवी, प्रमुख कार्यवाह रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या नावे – पुण्याई, ६७४ ब, श्रीरामनगर, मु. पो. नाचणे, ता. जि. रत्नागिरी, संपर्क क्रमांक – ७९७२२१२९४४ या पत्त्यावर पाठवण्यात यावा. असे आवाहन श्रीकृष्ण साबणे अध्यक्ष – रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 23/Apr/2025

Shanti real estate 1