रत्नागिरी : फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी २५ एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन

रत्नागिरी : सर्व फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी २५ एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये आंबा व काजू या फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबवण्यात येत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे, परंतु, फळपिकांची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाइल अॅपद्वारे केलेली नाही त्यांनी २५ एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा १२ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार ७/१२ उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही, याची फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 24/Apr/2025