लांजा शहर विकास आराखड्याबाबत २६ एप्रिल रोजी सभा

लांजा : लांजा शहराचा प्रारूप विकास आराखडा बाबत प्रशासन आणि नागरिकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. शहराच्या डीपीआर बाबत नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या शंका, अडचणी निरसन करण्यासाठी २६ एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन केले केले आहे.

आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. लांजा शहारातील गणेश मंगल कार्यालय आग्रे हॉल येथे २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. लांजा नगरपंचायत प्रशासनाने प्रसिद्धी साठी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे की, लांजा नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा राजपत्रामध्ये प्रसिद्ध केला आहे. त्या अनुषंगाने लांजा शहरातील नागरिकांना डीपीआर समजावून सांगणे तसेच येथील लोकांची शंका, अडचणीचे निरसन करणे यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला नगर रचनाकार रत्नागिरी, लांजा तहसीलदार, लांजा पोलीस निरीक्षक, लांजा उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेसाठी लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांनी विकास आराखडा समजून घेण्याकरता व विकास आराखडा बाबत निरसन होण्यासाठी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन नगरपंचायत प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 24/Apr/2025