चिपळूण : काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला हा मानवतेच्या विरोधातील कृत्य असून, संपूर्ण देशाच्या मर्मावर आघात करणारा आहे. या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करणार आहे.
देशातील शांतता, एकोपा आणि सौहार्द धुळीस मिळवण्यासाठी हे दहशतवादी कट रचले जात आहेत, पण आपल्या एकतेपुढे हे सर्व प्रयत्न नेहमीच निष्फळ ठरतील. याच पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता, चिंचनाका चिपळूण येथे, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन या अमानवी कृत्याचा निषेध नोंदवावा.
यासाठी आवश्य उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष नितिन ठसाले, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, युवक अध्यक्ष निलेश कदम यांनी आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 24/Apr/2025














