खेड : तालुक्यातील सोनगाव माटवाडी येथे राहणाऱ्या एका वृद्धचा जिन्यावरून पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २३ एप्रिल रोजी दुपारी १:४० वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती जिन्यावरून खाली उतरत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डाव्या डोळ्याच्यावर गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी लोटे येथील परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सायंकाळी ७:४९ वाजता त्यांचा मृत्यू झाला. खेड पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 24/Apr/2025














