चिपळूण : प्रवाशांच्या मागणीनुसार उन्हाळी हंगामासाठी चिपळूण आगारातर्फे छत्रपती संभाजीनगर एसटी बसफेरी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. चिपळूण येथील बसस्थानकातून ही बसफेरी सकाळी १०:३० वाजता सुटणार आहे. संभाजीनगर येथून सकाळी नऊ वाजता चिपळूणकडे बसफेरी मार्गस्थ होणार आहे.
या बसफेरीसाठी मागणी करण्यात येत होती. आता बस सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील प्रवाशांनी या बसफेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 24/Apr/2025














