संगमेश्वर : हातीवमध्ये २६ एप्रिल पासून शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील शिवप्रताप प्रतिष्ठानतर्फे दि. २६ एप्रिल ते दि. ३ मे या कालावधीत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हातीव ग्रामपंचायतीसमोर सायंकाळी ४:३० वाजता शिबिर होणार आहे. कोल्हापूर येथील शांतिदूत मर्दानी आखाडाचे शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्राचे अतुल शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 24/Apr/2025