कडवई : संगमेश्वर (नावडी-भंडारवाडी) येथील श्री निनावी देवी मंदिराचा जिर्णोद्धार व नूतन वास्तू समारंभ २८, २९ व ३० एप्रिल रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन निनावी देवी प्रासादिक मंडळ, संगमेश्वर व मानकरी दत्ताराम किसने सुर्वे (बावा सुर्वे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
मंदिरात निनावी देवी, विठ्ठलाची वरदानी, वाघजाई व मानाई देवी यांच्या मूर्ती आहेत. सन १९८७ मध्ये मंदिराच्या जागी दुसऱ्या टप्प्यात नवीन मंदिर बांधण्यात आले. सन २०२३ ते २०२५ या कालावधीत मंदिराच्या नूतन वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमेश्वर पंचक्रोशीत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. या बांधकामासाठी भंडारी, तेली, नाभिक समाजबांधव, माहेरवाशिणी, मित्रमंडळ पाहुणे, पंचक्रोशीतील नागरिक यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यान मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास गेले, असे अध्यक्ष बावा सुर्वे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 24/Apr/2025














