रत्नागिरी : अनेक उत्साही पर्यटक आपल्या गाड्या स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकताच वाळूत नेत असतात. त्यामुळे अनेकदा वाळूत किंवा पाण्यात गाड्या अडकण्याच्या घटना वारंवार घडत असतात. गुरुवारी रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी मुंबईतून आलेल्या पर्यटकांची गाडी वाळूत अडकून पडली. तासभर प्रयत्न करुनही गाडी निघत नव्हती अखेर ग्रामस्थांनी मदतीचा हात देत ही गाडी वाळूमधून बाहेर काढण्यात यश मिळवले.
मुंबईतून ४ वाजण्याच्या सुमारास झरीविनायक मंदिराच्या समोर भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी आपली गाडी वाळूमध्ये नेली. त्यानंतर गाडी बाहेर काढताना ती वाळूत रुतली. तासभर प्रयत्न करुनही गाडी वाळूच्या बाहेर निघत नव्हती.
त्यामुळे पर्यटक चांगलेच घामाघुम झाले होते. हा प्रकार भाट्ये ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच, माजी सरपंच पराग भाटकर, महेश भाटकर, रत्नसागर रिसॉर्टचे वॉचम राजन शिवलकर यांच्यासह काही ग्रामस्थ मदतीला आले. त्यांनी ही गाडी बाहेर काढण्यात पर्यटकांना सहकार्य केले. मुंबईतून आलेल्या पर्यटकांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 25/Apr/2025














