खेड : उन्हाळी सुट्टासाठी एसटी महामंडळाने अर्नाळा-गुहागर बसफेरी सुरू केल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. अर्नाळा येथून सकाळी ७.४५ वाजता सुटणारी बस गुहागरमधून सकाळी ७.३० वाजता सुटते.
विरार, विरारफाटा, ठाणे-खोपट, पनवेल, पेण-रामवाडी, माणगाव, महाड, पोलादपूर, पोलादपूर, भरणे, भरणे चिपळूण, मिरजोळी, माळघर, तांबी, रामपूर, घोणसरे, णसरे, देवघर, चिखली, श्रृंगारतळी मार्गे मार्गे गुहागरला पोहचेल. बससेवेचे आरक्षण खुले झाले आहे. प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे जनसंपर्कप्रमुख साहिल हुंबरे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 25/Apr/2025














