खेड : कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना उन्हाळी सुट्टी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ३ एप्रिलपासून चालवण्यात येत असलेल्या एलटीटी- तिरुवअनंतपूरम साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. स्पेशल २९ मेपर्यंत दर गुरुवारी धावणार आहे.
ही स्पेशल एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटणारी स्पेशल तिरुवअनंतपूरम येथे त्याचदिवशी रात्री १०.४५ वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात तिरुवअनंतपूरम येथून पहाटे ४.२० वाजता सुटणारी स्पेशल त्याच रात्री १२.४५ वाजता एलटीटीला पोहोचते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 25/Apr/2025














