रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे बाजारपेठेत इमारतीचे बांधकाम करताना लिफ्ट तुटून चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. सुमारास घडली.
रमेशकुमार बनसीनाथ योगी (वय ३८, रा. गडतकनी, ता. श्रीमधूपूर जि. सिकर, राजस्थान) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो गेल्या पाच वर्षांपासून टाईल्स फिटिंगचे काम करत होता. बुधवारी तो कोतवडे बाजारपेठ येथील अनिल बाळकृष्ण घईसास यांच्या इमारतीचे काम करत असताना लिफ्ट अचानकपणे तुटली. लिफ्टमध्ये अडकून लिफ्टसह चौथ्या मजल्यावरुन खाली पल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 26/Apr/2025














